Language

हरभरा

जमिनीची निवड :-
 मध्यम ते भारी जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम ठरते. चोपून, निचरा न होणाऱ्या जमिनीत तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची कमीत कमी मशागत करावी त्यामुळे जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
पेरणीचा कालावधी व पद्धत :-
  जिरायती हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. जिरायती परिस्थितीत देशी हरभरा झाडांची हेक्टरी संख्या राखण्याकरिता बियाणे चार तास पाण्यात भिजवून व नंतर सावलीत वाळवून बीजप्रक्रिया करूनच पेरावे. ओलिताखाली हरभरा ओक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडात पेरल्यास अधिक उत्पादन मिळते. काबुली हरभऱ्याची उशिरा पेरणी १० नोव्हेंबरच्या आसपास करावी. देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळींतील अंतर ३० सेमी., तर दोन झाडांतील अंतर १० सेंमी. ठेवावे. कांबुली वाणाकरिता आयसीसीव्ही-२, पीकेव्ही काबुली-२ व पीकेव्ही काबुली-४ : १०० ते १२५ किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
आंतरमशागत :-
 पीक ४० ते ४५ दिवसांपर्यंत दोन डवरणीच्या पाळ्या व एक निंदणी आवश्यकतेनुसार देऊन पीक तणविरहित ठेवावे.
पाणी व्यवस्थापन :-
उगवणीनंतर पहिले पाणी पीक खालीवर असताना (४० ते ४५ दिवसांनी ), दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (७० ते ७५ दिवसांनी ) द्यावे. दोन ओळी रुंद वरंबा सारी पद्धतीने ओळीत केल्यास इतर पद्धतीच्या मानाने ३० टक्के पाण्याची बचत होते. तसेच उत्पादनात २० टक्के वाढ मिळते. माध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, काली असताना दुसरे व घाटे भरतेवेळी तिसरे पाणी द्यावे. हलक्या जमिनीवर घेतलेल्या हरभऱ्याच्या मात्र पिकांची स्थिती पाहून उगवणीनंतर ओळीत करावे. अधिक प्रमाणात पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो. जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. मात्र पाणी देण्यास उशीर करून जमिनीस भेगा पडू देऊ नयेत, तसेच पाणी साचू देऊ नये. अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. हरभरा पिकास एक ओळीत दिल्यास उत्पादनात ३० टक्के वाढ होते, तर दोन ओळीत दिल्यास ५२ टक्क्यापर्यंत वाढ होते.
कापणी :-
 हरभऱ्याच्या परिपक्व्तेच्या काळात पाने पिवळी पडतात, घाटे वाळू लागतात, त्यानंतर पिकाची कंपनी करावी. अन्यथा पीक जास्त वाळव्यावर घाटेंगल होऊन नुकसान होते. त्यानंतर खाल्यावर एक दोन दिवस काढलेले हरभरा वाळवून मळणी करावी.