मका
पेरणी :-
खरीप हंगाम : १५ जून ते १५ जुलै
रब्बी हंगाम : १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
उन्हाळी : १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
मशागत :
जमिनीची खोल (१५ ते ५० सें. मी. ) नांगरणी करावी. कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. प्रतिहेक्टरी १० ते १२ टन शेणखत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही.
लागवडीच्या सुधारीत पद्धती :-
खरीप : सपाट जमिनीवर लागवड
रब्बी : सरी वरंबा पद्धतीने लागवड
लागवडीचे अंतर :-
उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी : ७५ सें. मी. बाय २० से. मी.
लवकर पव्क होणाऱ्या जातीसाठी : ६० सें. मी. बाय २० सें. मी.
बियाणे प्रमाण :-
१५ ते २० किलो प्रतिहेक्टरी.
बीजप्रक्रिया:-
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ते २.५ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
पाणी व्यवस्थापन :-
खरीप हंगामात पुरेसा पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
रब्बी आणि उन्हाळी हंगाम :
पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी ( पिकाची शाखीय अवस्था.)
पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी (पीक फुलोऱ्यात असताना )
दाणे भरण्याचे वेळी : पेरणीनंतर ७० ते ८० दिवसांनी.
आंतर मशागत :-
तणनियंत्रण :
पेरणी संपताच चांगल्या वापशावर ऍट्राझीन २.५ केली प्रतिहेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे.
फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये.
तणनाशक फवारणीनंतर १५ ते २० दिवसापर्यंत आंतर मशागत करू नये.
काढणी :-
कणसावरील आवरण पिवळसर पांढरे आणि दाणे टणक झाल्यावर धान्यासाठी काढणी करावी.
कणसे सोलून खुडून घ्यावीत.
सोललेली कणसे तीन दिवस उन्हात वाळवावीत.
मका सोलणी यंत्राने कणसातील दाणे काढावेत.
मका दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के होईपर्यंत उन्हात चांगले वाळवावेत. म्हणजे साठवणुकीत किडीमुळे नुकसान होत नाही.