Language

कापूस

लागवड व्यवस्थापन :-
जमिनीची निवड
 लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी. कपाशी झाडाची मुले जमिनीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत वाढतात, त्यामुळे उथळ व कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर लागवड करू नये. लागवडीसाठी जमिनीची खोली किमान ६० ते १०० सें. मी. असावी. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असावा कोरडवाहू लागवडीमध्ये हलक्या जमिनित पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार घट होते. पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीन कपाशीला हानिकारक असते. पी अधिक ओलावा व चिबड परिस्थितीत तग धरू शकत नाही. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्यास चार काढावे.
जमिनीची मशागत :-
 जमिनीमध्ये कठीण ठार तयार झाला असल्यास नांगरणीमुळे तो फोडला जातो. कापूस पिकाची मुळे जमिनीमध्ये तीन फुटापेक्षा खोल जातात. जिरायती लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीत दोन- तीन वर्षांनी एक वेळ खोल नांगरणी करावी. बागायती लागवडीसाठी दार वर्षी नांगरणी करून वखरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी, यामुळे मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या प्रत्येकी दोन आठवड्यांच्या अंतराने द्याव्यात. त्यानंतर बागायती लागवडीसाठी ओळींच्या अंतरानुसार ३० सें. मी. रुंदीच्या साऱ्या पाडाव्यात.
फेरपालट :-
 एकाच जमिनीत सतत एकाच पीक घेतल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घाट येते. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, शेतीची उत्पादकता वाढविणे व उत्पादनातील शाश्र्वतता राखण्यासाठी पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे आवश्यक आहे. मागील हंगामात कापसाचे पीक घेतलेल्या जमिनीवर पुन्हा कापसाची लागवड करू नये. कारण त्या पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडी मातीमध्ये सुप्तावस्थेत राहतात, पुढील हंगामामध्ये पुन्हा तेच पीक घेतल्यास त्या किडीचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे योग्य फेरपालट आवश्यक. जिरायती क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकांनतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बागायती लागवडीमध्ये बीटी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीकपद्धती फायदेशीर ठरते.
पेरणीची वेळ :-
 पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा व पूणे जिल्ह्याच्या भागात मार्च महिन्यात, तर नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कापसाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. खानदेशामध्ये पूर्वहंगामी कापसाची लागवड मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. मराठवाडा व विदर्भात बागायती कापूस पिकाची लागवड मी महिन्याचा शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. जिरायती कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी.
पाणी व्यवस्थापन :-
 कापूस पिकास ६५०-११००मि. मी. पाणी लागते. कापूस पिकाची लागवड भिन्न प्रकारच्या जमिनीवर होत आहे. त्याचबरोबर सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कपाशीच्या जाती वेगवेगळ्या कालावधीमध्ये पव्क होतात. कापूस पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी- जास्त होते. महाराष्ट्रामध्ये कपाशीस हंगामानुसार २००-७०० मि. मि. सिंचनाची गरज लागते. कापूस पिकास एकूण पाण्याच्या गरजेपैकी उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत २० टक्के, पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात ४० टक्के, फुले लागणे ते बोन्डे लागण्यापर्यंत ३० टक्के व बोन्डे लागणे ते शेवटची वेचणी होईपर्यंत १० टक्के पाण्याची गरज लागते. म्हणजेच सुरवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते, पाते लागण्यापासून बोन्डे लागण्यापर्यंत कपाशीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते. त्यानंतर पुन्हा पाण्याची अगराज कमी होते. सुरवातीच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडीची मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे व बोन्डे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा तान पडल्यास संरक्षित पाण्याची सोया करावी. बागायती बीटी कापसाची पेरणी मी महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीकवाढीच्या अवस्थेमध्ये पिकांची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. पावसाचा खंड पसल्यास पिकास पाणी द्यावे. पाते, फुले व बोन्डे लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते, फुले व बोन्डे गळण्याची शक्यता असते, पाते लागणे, फुले लागणे, बोन्डे लागणे व बंडे फुटणे या पीकवाढीच्या महत्वाच्या अवस्था आहेत. या अवस्थांवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावरील ३०-४० टक्के बोन्डे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याची जवळपास ५० टक्के बचत होते, त्याचबरोबर उत्पादनामध्ये ३५-४० टक्के वाढ होते. कपाशीच्या धाग्याच्या गुणधर्मात सुधारणा होते. जिरायती लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अश्या वेळी एक सारी आड याप्रमाणरे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य होते.
कापूस वेचणी व साठवण:-
 कपाशीची वेचणी साधारणतः ४० टक्के बोन्डे फुटल्यानंतर करावी. पुढील वेचणी जवळपास १५-२० दिवसांनी करावी. वेगवेळ्या जातीचा व वेचणीचा कापूस स्वत्तंत्र वाचावा व साठवणूक वेगवेळी करावी वेचणी शक्यतो सकाळी करावी, जेणेकरून थंड वातावरणात काडीकचरा कपाशीच्या बोडासोबत चिकटून येणार नाही. वेचणी करताना फक्त पूर्ण फुटलेली बंडे वेचावीत. पावसात भिजलेली बोडे वेगळी वेचावीत. शेवटच्या वेचणीच्या वेळी कवडी कापूस वेचावा. वेचणीनंतर कापूस ३-४ दिवस वाळवावा.

Read More..