Language

भुईमुंग

जमीन :-
 भुईमुगाच्या लागवडीसाठी माध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. मुलांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
हवामान :
 हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.
पूर्वमशागत :-
 भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुलांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत हवी. त्यासाठी जमिनीची मशागत चांगली होणे आवश्यक आहे. त्यासाठी १५ से. मी. खोल नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीआधी ७.५ टन प्रतिहेक्टरी शेणखत मिसळावे. याप्रमानात शेणखत या कंपोस्ट खत शेतात पसरवून द्यावे. जेणेकरून कुळवणी केल्याने ते चांगले पसरले जाईल.
पेरणीची वेळ :-
 खरिपात पेरणी जून- जुलै महिन्यात मान्सून सुरु होण्याच्या वेळेवर अवलंबून असते. भुईमुगाची पेरणी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
पेरणी अंतर :-
 सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. व दोन रोपांतील अंतर १० सेंमी. ठेवावे. जेणेकरुन हेक्टरी ३.३३ लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल. टोकंन पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी ३.३३ लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी. खोलवर करावी.
पेरणी पद्धत :-
 भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल.
सपाट वाफा पद्धत :-
 पेरणी सतत वाफ्यावर कार्ययची झाल्यास ३० सेंमी. अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी. ठेवावे व पाणी द्यावे. त्यानंतर ७-८ दिवसानी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घाव्यात.
आंतरमशागत :-
 भुईमुगाचे पीक ४५ दिवसापर्यंत ताणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या १५-२० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १०-१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. ३५-४० दिवसांनंतर आर्य सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीची काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे. म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.
पाणी व्यवस्थापन :-
 करीत भुईमुगासाठी ४० ते ५० सेंमी. तर उन्हाळी भुईमुगाची ७० ते ८० सेंमी. पाणी लागते. परंतु प्लास्टिक आच्छादित तंत्रामुळे ४५-५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत हि प्लास्टिक आच्छादन तंत्राने घेतलेल्या भुईमुगाची उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. जी पिकवाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तुषार सिंचनाने सामान पद्धतीने पाणी देता येते.
काढणी:-
 भुईमुगाच्या पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टॅन्क बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८-९ टक्क्यापर्यंत खाली आणावे.

Read More..