Language

सोयाबीन

पूर्व मशागत :-
  पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी जमिनीची २ ते ३ वर्षात किमान एकदा खोल नांगरणी करावी. पूर्वीच्या पीक काढणीनंतर उन्हाळ्यात एक खोल नांगरणी (३० ते ४५ से. मी. ) करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेत २ - ३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या वखर पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या शेणखत ( ५ टन ) जमिनीत पसरून द्यावे.
पेरणीची वेळ:-
  पेरणी खरीप हंगामात मान्सूनच्याआगमनावर अवलंबून असते. मराठवाडा विभागात सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ७५ ते १०० मि. मी. पर्जन्यमान झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आद्रता असल्याची खात्री करूनच पेरणी करावी.
लागवडीचे अंतर व पद्धत:-
 सोयाबीन ची पेरणी ४५ बाय ५ से. मी. किंवा ३० बाय ७.५ से. मी. अंतरावर पाभर किंवा ट्रॅक्टरचलित सीड ड्रिलच्या साहाय्याने करावी. पेरणी करते वेळेस बियाणे २.५ ते ३.० से. मी. खोलीच्या जास्त खोल पेरू नये अन्यथा बियाण्याची उगवण कमी होऊन उप्तादनात घट येऊ शकते. मान्सूनच्या पावसाच्या आगमनास उशीर झाल्यास किंवा पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणाची लागवडीसाठी निवड करून पेरणीसाठी प्रतिहेक्टरी २५ टक्के जास्त बियाणे वापरावे व दोन ओळींतील अंतर ३० से. मी. ठेवावे.
आंतर मशागत:-
  पेरणीनंतर पीक २० ते ३० दिवसांचे असताना कोळपणी व निंदणी करून शेत ताणविरहित ठेवावे. मागील काही वर्षांपासून पेरणींनंतर निरंतर पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या कमतरतेमुळे निंदणी वा कोळपणी करण्यास अवघड होत आहे. अश्या परिस्थितीत तणनाशकाचा वापर प्रभावी ठरतो.
उत्पादन:-
  लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञाचा अवलंब केल्यास सोयाबीनचे २५ ते ३० क्विंटल प्रतिहेक्टर इतके हमखास उत्पादन येऊ शकते.

Read More..