Language

खरबूज

जमीन:-
 पाण्याचा उत्तम निचरा होणारी माध्यम ते भारी जमीन योग्य निवडावी.
लागवडीची वेळ :-
जानेवारी - फेब्रुवारी
लागवडीची पद्धत :- दांडाच्या काठाने लहान आळ्यामध्ये बी टोकून पेरणी करावी हेक्टरी बियाने : २ - ३ किलो
पूर्वमशागत :-
 शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३० - ४० गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.
लागवड :-
 दांडाचे काठाने लहान आळ्यामध्ये २ मी. X ६० सेमी. अंतरावर व टोकावे, संकरित जातीकरिता २ X १ मित्र अंतर ठेवावे.
ओळीत:-
 दर ६-८ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीचा मगदूर व पिकाच्या गरजेनुसार हा कालावधी कमी जास्त करावा.
आंतरमशागत :-
 पीक स्वच्छ व निरूगी राहण्यासाठी २ - ३ निंदण द्यावेत. फळधारणा झाल्यावर वेळी वरील फळे हि गवत किंवा पाला पाचोळा याचे सहाय्य्यने पूर्णपणे झाकून टाकावित.
पिकाचा कालावधी :-
  खरबूज हे पीक साधारणपणे १०० - १२० दिवसात तयार होते.
काढणी :-
 पूर्णपणे वाढ झालेली व परिपकव झालेली फळे वरचे वर काढावीत.