Language

तूर

जमीन:-
मध्यम ते भारी काली कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत पेरणी टाळावी.
पेरणीची वेळ :-
जूनचा दुसरा पंधरवडा व जुलैचा पहिला आठवडा.
पेरणी:-
पेरणी अंतर - अतिहळवे वाण (उदा.आयसीपीएल ७८८७ ) ४५ बी १० सेंमी .
हळवे वाण - ( उदा. एकेटी - ८८११, राजेश्वरी ) ६० बाय २० सेंमी
निमगरवे वाण - (उदा. विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३) ९० बाय २० सेंमी.
पाणी व्यवस्थापन :-
तूर हे कडधान्य पीक बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच येते तथापि पाऊस कमी झाला असल्यास आणि पिकास पाण्याचा मोठा टॅन पडलेला दिसून आल्यास खालीलप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. पहिले पाणी - पिकास फुलकळी लागताना
दुसरे पाणी - पीक फुलोऱ्यात असताना
तिसरे पाणी - शेंगांमध्ये दाणे भरताना
शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावि. खते व पाणी यांचा अवाजवी वापर टाळावा.
आंतरमशागत व पीक संरक्षण :-
पहिल्या वीस दिवसात एक कोळपणी व खुरपणी करावी. त्यानंतर पिकास फुलकळी लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी घावी. यानंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (१० मि. लि. प्रति १० लिटर पाण्यात ) या जैविक कीडनाशकाची फरवानी करावी. आवश्यकतेनुसार तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी स्पिनोसॅड ४ मिलि. प्रति १० लिटर पाण्यात म्हणजेच २०० मिलि प्रतिहेक्टर किंवा फ्लूबेंडिअमाईन दोन मिलि प्रति १० लिटर पाण्यात म्हणजेच १०० मिलि प्रतिहेक्टर या प्रमाणे फवारावे. शेतामध्ये हेक्टरी १० ते १२ कामगंध (फेरोमोन ट्रॅप्स ) सापळे लावावेत. पक्ष्यांना बसण्यासाठी तुरकाट्या, मचाने लावावीत. त्यामुळे हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा किडींचे (अन्य नाव - हरभऱ्यावरील घाटेअळी ) प्रभावी नियंत्रण होते.