Language

डाळिंब

हवामान :-
 दलोंबाचे पिकास कोरडे हवामान उपयुक्त आहे. उन्हाळ्यातील कडक ऊन व कोरडी हवा तसेच हिवाळ्यातील कडक थंडी डाळींबाच्या वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार होतात परंतु अशा प्रकारच्या हवामानात जरी थोडा फार फरक झाला तरी सुद्धा डाळींबाचे उत्पन्न चांगले येते. फुले लागल्यापासून फळे तयार होईपर्यंतच्या काळात भरपूर ऊन व कोरडे हवामान असल्यास चांगल्या प्रकारची गॉड फळे तयार होतात. कमी पावसाच्या प्रदेशात जेथे थोडीफार ओलिताची सोया आहे तेथे डाळींबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
जमीन:-
 डाळींबाचे पीक कोणत्याही जमिनीत घेण्यात येते. अगदी निकस, निकृष्ट जमिनीपासून भारी, माध्यम काळी व सुपीक जमीन डाळींबाच्या लागवडीसाठी चांगली असते. मात्र पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयांची जमीन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्याचप्रमाणे हलक्या, मुरमाड, माळरान किंवा डोंगर उताराच्या जमिनीसुद्धा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. डाळींबाचे पी जमीन व हवामानास संवेदनशील आहे. भारी ते अतिशय भारी जमिनी, पाणथळ व खोलगट जमिनी, आद्रता असणाऱ्या भागांमध्ये डाळींबाची लागवड करू नये.
लागवड:-
 जमिनीच्या मगदूरा प्रमाणे प्रतिहेक्टरी झाडांची संख्या ठरवावी. गवड करण्यापूर्वी ६० x ६० x ६० से. मी. आकारचे खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्याच्या तळाशी वाळलेला पालापाचोळ्याचा १५ से. मी. ठार देऊन २० किलो चांगले कुजलेले शेणखत, २ केली गांडूळखत, ३ किलो कडू निंबोळी पेंड, २५ ग्रॅम. ट्रायकोडर्मा यांचे मिश्रणाने जणींनी बरोबर भरून घायवेत व सर्वसाधारण पावसाळ्यात लागवड करावी व लागवडीनंतर १५ ग्रॅम पीएसबी व ऍझोटोबॅक्टर चा वापर करावा.
फळांची तोडणी :-
 डाळींबाचे फळ तयार होण्यास फुले लागण्यापासून साधारणतः ६ महिने लागतात. आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्ट मध्ये मृगबहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये आणि हस्तबहाराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल मध्ये तयार होतात. फळाची साल पिवळसर करड्या रंगाची झाली म्हणजे फळ तयार झाले असे समजावे व फळांची तोडणी करावी.