Language

टरबूज

जमीन :-
 पाण्याचा उत्तम निचरा होणारी, माध्यम ते भारी जमीन निवडावी.
लागवडीची वेळ :-
जानेवारी - फेब्रुवारी
लागवडीची पद्धत :- दंडाचे काठाणे लहान आळ्यामध्ये बी टोकून पेरणी करावी. हेक्टरी बियाणे :- ३ - ४ किलो
पूर्वमशागत :-
 शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ३० - ४० गाड्या टाकून पुन्हा वखरणी करावी.
लागवड :-
 दांडाचे काठाने लहान आळे करून २ x १ मित्र अंतरावर बी टोकावे. बिया २४ तास पाण्यात भिजवून लावल्यास उगवण लोणकर व चांगली होते.
आंतरमशागत :-
 पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावे. फळ धारणा झाल्यावर फळे गवताने किंवा पाला पाचोळ्यांचे साहाय्याने पूर्णपणे झाकून टाकावी. फळाखाली सुद्धा पण पाचोळा घालावा.
पिकाचा कालावधी :-
  टरबूज हे पीक १०० - १२० दिवसात तयार होते.
काढणी :-
  पूर्णपणे वाढ होऊन परिपकव झालेली फळे वरचे वर काढत राहावीत.