Language

गहू

जमीन :-
 पाण्याचा चांगला निचरा होणारी, माध्यम ते भारी जमींन आवश्यक असते.
हवामान :-
 गहू पिकाला थंड कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात हवामान चांगले मानवते. पिकाच्या वाढीसाठी ७-२१ डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ डिग्री से. तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन त्याचे वजन वाढते.
पूर्वमशागत:-
 खरीप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने जमिनीची १५ ते २० सें. मी. खोलवर नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी आधी हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खात शेतात पसरून टाकावे. पूर्वीच्या पिकांच धसकटे व अन्य काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
पेरणीची वेळ :-
 जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागयाती वेळेवर पेरीणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायत उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरच्या दरम्यान करावी. बागायती गव्हाची पेरणी १९ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक उशिराच्या पंधरवाड्यात गव्हाचे उत्पादन प्रत्येकी हेक्टरी २.५ क्विंटलने घटते.
पेरणी पद्धत:-
 गव्हाच्या जिरायती आणि बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळींतील २२.५ सें. मी. आणि बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळींतील १८ सेमी. अंतर ठेऊन पाभरीने पेरणी करावी. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सेमी. खोल करावी.
आंतरमशागत :-
 जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. गव्हामधील रुंद पानाच्या तणांच्या नियंत्रणासाठी ताणें दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर मेटसल्फ्युरॉन मिथाईल (२० टक्के) हेक्टरी २० ग्रॅम प्रति ८०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापणी व मळणी
 गव्हाच्या काही जातींचे दाणे पीक पव्क झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पव्क होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कंपनी करावी. कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी. मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.